धनुषला कळसूबाई शिखर सर करायला साधारण 3 तास 50 मिनिटे कालावधी व शिखरावरून खाली उतरण्यासाठी 2 तास 35 मिनिटे एवढा कालावधी लागला.
2/7
कळसुबाई शिखरावर आलेल्या इतर ट्रेकर्सनेही धनुषचे भरभरून कौतुक केले आणि त्याला सोबत घेऊन व्हिडिओ, फोटो शूट केले.
3/7
कळसूबाई शिखरही धनुषने कोणाचीही मदत न घेता सर केलं. धनुषचा उत्साह पाहण्यासारखा होता, असं त्याचे वडील सांगतात.
4/7
अशेरी गडावरही धनुष कुणाचीही मदत न घेता हळूहळू ट्रेकिंग करत होता.
5/7
त्यानंतर धनुषचे वडील शिखरांवर आणि गडांवर ट्रेकिंगसाठी जायचे आणि घरी परतल्यावर त्यांनी काढलेले व्हिडिओज, फोटो धनुष पाहायचा. याच माध्यमातून त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली.
6/7
साधारण एक वर्ष आधी धनुष आपल्या वडिलांच्या सोबत डहाणूच्या महालक्ष्मी गडावर गेला होता आणि तो कुणाच्याही मदतीविना ह्या गडावर चढला होता.
7/7
पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील धनुष या चार वर्षाच्या चिमुकल्याने महाराष्ट्रातील उंच कळसुबाई शिखर सर केलं आहे.