प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमने नुकतेच फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीचे हे फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये यामी गौतम लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
2/5
यामीने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'रेड ड्रेस झिरो स्ट्रेस'.
3/5
करिअर बद्दल बोलायचे झाले तर यामी गौतम नुकतीच 'भूत पोलिस' चित्रपटात दिसली. या चित्रपटात यामीसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही आणि प्रेक्षकांनाही काही विशेष आवडला नाही.
4/5
बातम्यांनुसार, यावेळी यामी गौतमचकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. यामध्ये अभिषेक बच्चनसोबतचा 'दुसवी', अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' तसेच 'लॉस्ट' आणि 'ए गुरूवार' यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
5/5
अभिनेत्री यामी गौतमने याचवर्षी ४ जून रोजी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले होते. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात हा विवाह अतिशय साधेपणाने पार पडला.