'मी वसंतराव' (Me Vasantrao) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
2/8
हा सिनेमा ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत आहे.
3/8
या सिनेमाचे दिग्दर्शन निपुन धर्माधिकारीने केले आहे.
4/8
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
5/8
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य आणि सांगीतिक प्रवास 'मी वसंतराव' या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
6/8
अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट म्हणजे 'मी वसंतराव' हा सिनेमा असणार आहे.
7/8
सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे.
8/8
राहुल देशपांडे व्यतिरिक्त सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जिओ स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा 1 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.