"आई कुठे काय करते" मालिकेत सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे नवरात्रीचा सणदेखील जल्लोषात साजरा झालेला पाहायला मिळणार आहे.
2/6
मालिकेतील देशमुख कुटुंबाला प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येत आनंद लुटताना दिसून येतात.
3/6
सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे घरात नवरात्री निमित्त भोंड्याचा खेळ रंगणार आहे.
4/6
कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
5/6
महिलांसाठी खास असणाऱ्या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.
6/6
'मराठी परंपरा मराठी प्रवाह' हे स्टार प्रवाह वाहिनीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मालिकांमधून मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाच्या भोंडल्याला मालिके इतकाच प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील.