एक्स्प्लोर
अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी कुस्ती खेळायचा 'हा' सुपरस्टार; एकाच वर्षात दिल्यात 25 हिट फिल्म्स
Guess Who: आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टारची ओळख करून देत नाही, तर एका साऊथच्या स्टारची ओळख करून देत आहोत, जो अभिनय करण्यापूर्वी कुस्ती खेळायचा... तुम्ही ओळखता का?
South Superstar Actor Life Story
1/10

South Superstar Actor Life Story: साऊथच्या सिनेमांची क्रेझ आता बॉलिवूडपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे असे अनेक स्टार आहेत, जे वर्षानुवर्ष आपल्या अभिनयानं मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत.
2/10

आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, तो अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी एक प्रसिद्ध कुस्तीगीर होता. त्यानं कुस्तीत अनेक पदकं जिंकलीत. जेव्हा त्यानं अभिनयाला सुरुवात केली, तेव्हा त्यानं तिथेही धुमाकूळ घातला, एकाच वर्षात 25 सुपरहिट चित्रपट दिले.
3/10

खरं तर, आपण 40 वर्ष साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा सुपरस्टार मोहनलाल यांच्याबद्दल बोलणार आहोत. अलिकडेच, त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी आली. या अभिनेत्याला लवकरच दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. 23 सप्टेंबर रोजी 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाईल. म्हणून, आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनाची ओळख करून देत आहोत.
4/10

'दृश्यम' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले मल्याळम स्टार मोहनलाल विश्वनाथन यांनी अभिनयाकडे वळण्यापूर्वी कुस्तीत आपलं नशीब आजमावलं. ते 1977 ते 1978 पर्यंत राज्यस्तरीय कुस्ती चॅम्पियन होते.
5/10

यानंतर, हा अभिनेता दिल्लीला गेला, जिथे तो राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार होता. पण नशिबानं त्याला अभिनयाकडे नेलं. त्याला चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं आणि त्यानं कुस्ती सोडून अभिनय करण्याचा निर्णय घेतला.
6/10

मोहनलाल केवळ पहलवानच नाही तर, त्याच्याकडे तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट देखील आहे. दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वांदो मुख्यालयानं 2012 मध्ये त्याला ब्लॅक बेल्टनं सन्मानित केलं. त्याला चार राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.
7/10

चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय, एका वर्षात त्यांचे 35 चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यापैकी 25 सुपरहिट ठरले.
8/10

या वर्षी, 2025 मध्ये, मोहनलाल यांचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हृदयपूर्वम, थुडाराम आणि एल२ एम्पूरन, जे सर्व ब्लॉकबस्टर हिट ठरले.
9/10

या वर्षी, 2025 मध्ये, मोहनलाल यांचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हृदयपूर्वम, थुडाराम आणि एल२ एम्पूरन, जे सर्व ब्लॉकबस्टर हिट ठरले.
10/10

मोहनलाल यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर, मोहनलाल यांच्या पत्नीचं नाव सुचित्रा. हे जोडपं दोन मुलांचे पालक आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी.
Published at : 22 Sep 2025 07:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























