एक्स्प्लोर
Advertisement

Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकरने फिटनेसचा दिला नवा मंत्र, फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर!
श्रिया पिळगावकर सध्या तिच्या 'द ब्रोकन न्यूज 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचा एक फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्रिया पिळगावकर
1/10

ज्येष्ठ अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर तिच्या नवीन प्रोजेक्ट्समुळे नेहमीच चर्चेत असते.
2/10

श्रियाने स्वत:ला प्रत्येक शैलीतील भूमिकेशी सुंदरपणे जुळवून घेतले आहे.
3/10

याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
4/10

दरम्यान, अभिनेत्रीने तिची टोन्ड फिगर दाखवणारा एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5/10

काही काळापूर्वी श्रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो मिरर सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये ती जिममधून लॅव्हेंडर कलरचा ऍथलेझर परिधान केलेली दिसत आहे.
6/10

या फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मैदा नाही खाल्ला, कदाचित त्यामुळेच मदत झाली असेल.' आता अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.
7/10

त्याचबरोबर या फोटोच्या माध्यमातून श्रियाने तिच्या चाहत्यांना फिट राहण्याचा नवा मंत्रही दिला आहे.
8/10

श्रिया पिळगावकर सध्या न्यूजरूम ड्रामा वेब सीरिज 'द ब्रोकन न्यूज'च्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे.
9/10

या शोचा पहिला सीझन 2022 मध्ये रिलीज झाला होता. या मालिकेत जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'प्रेस' या ब्रिटीश मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे.
10/10

याशिवाय श्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या शीर्षकाने बनत असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.यात रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी आणि प्रतीक बब्बर सारखे स्टार्सही दिसणार आहेत. याशिवाय श्रिया 'ताजा खबर 2' मध्येही दिसणार आहे. (pc:/shriya.pilgaonkar/ig)
Published at : 15 May 2024 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
