राष्ट्रपती भवनात देशाच्या राष्ट्रपतींनी 141 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी सात सेलिब्रिटींना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
2/7
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला क्रीडा जगताकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आहे. गेल्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे
3/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यावेळी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
4/7
एअर मार्शल डॉ. पद्मा बंदोपाध्याय यांना वैद्यक क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले
5/7
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 8 नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या सोहळ्याला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
6/7
कंगना रणौत हिला कला क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये पद्मश्री पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले.
7/7
गायक अदनान सामीला आज देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.