एक्स्प्लोर
PHOTO : तब्बल 6000 क्रिस्टल, कोटींची किंमत, किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मर्लिन मुन्रोंच्या ‘त्या’ ड्रेसचं मोठं नुकसान!

Kim Kardashian
1/6

नुकत्याच झालेल्या Met Gala 2022मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. मात्र, जेव्हा किम कर्दाशियन (Kim Kardashian) रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा तिला पाहून सगळेच थक्क झाले. किमने दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचा 60 वर्ष जुना सुंदर गाऊन परिधान केला होता.
2/6

यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते. मात्र, किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन आता खराब झाला आहे.
3/6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम कर्दाशियनने परिधान केल्यानंतर हा गाऊन खराब झाल्याचे बोलले जात आहे. या 60 वर्ष जुन्या आयकॉनिक गाऊनचे अनेक क्रिस्टल्स बाहेर आले आहेत आणि काही धाग्यांवर लटकलेले दिसत आहेत. तर, काही धागेही तुटल्याचे बोलले जात आहे.
4/6

मेट गाला 2022च्या रेड कार्पेटवर किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन 6 दशक जुना असून, तो मर्लिन मुन्रोंच्या स्मरणार्थ आतापर्यंत जपून ठेवण्यात आला आहे. मर्लिन मुन्रो यांनी 60 वर्षांपूर्वी हा पोशाख परिधान केला होता. क्रिस्टलने सजवलेल्या या फ्लोअर लेन्थ गाऊनची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यामुळे हा ड्रेस परिधान करून किम चांगलीच चर्चेत आली होती.
5/6

दरवर्षी किम कार्दशियन तिच्या मेट गाला लूकमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. मर्लिन यांच्या या ड्रेसमध्ये फिट होण्यासाठी किमने अवघ्या 21 दिवसांत तिचे वजन 7 किलोने कमी केले होते.
6/6

ड्रेस परिधान करून जेव्हा ती रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. किम तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत या बॉडीकॉन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पोहोचली होती. तिच्या या झगमगाटी गाऊनने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
Published at : 15 Jun 2022 10:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion