एक्स्प्लोर
PHOTO: वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा... हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत!

(photo:hemangiikavi/ig)
1/6

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.(photo:hemangiikavi/ig)
2/6

मंगळवारी (14 जून) वटपौर्णिमेच्या निमित्तानं हेमांगीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये हेमांगीनं तिचे खास फोटो शेअर केले. या फोटोला हेमांगीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.(photo:hemangiikavi/ig)
3/6

हेमांगीनं तिचे काही फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?'(photo:hemangiikavi/ig)
4/6

पुढे हेमांगीनं लिहिलं, 'यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा! तरीही त्यातून "म्याडम तुमी उपास धरला काय" विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो! ' हेमांगीच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं, 'बरोबर बोलत आहात मॅम' अशी कमेंट केली. तर काहींनी फोटोमधील हेमांगीच्या लूकचे कौतुक केलं. (photo:hemangiikavi/ig)
5/6

हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.(photo:hemangiikavi/ig)
6/6

तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगी तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. (photo:hemangiikavi/ig)
Published at : 15 Jun 2022 04:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
