एक्स्प्लोर
Vedat Marathe Veer Daudle Saat: 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाची तगडी स्टारकास्ट; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
अक्षय कुमारसह प्रवीण तरडे, हार्दिक जोशी आणि इतर काही कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Vedat Marathe Veer Daudle Saat
1/9

'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
2/9

'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
3/9

चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे हा प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
4/9

तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात मल्हारी लोखंडे ही भूमिका साकारणार आहे.
5/9

बिग मराठी सीझन 3 चा विजेता विशाल निकम हा या चित्रपटात चंद्राजी कोठार ही भूमिका साकारत आहे.
6/9

अभिनेता विराट मडके हा या चित्रपटात जिवाजी पाटील ही भूमिका साकारत आहे.
7/9

बिग बॉस-3 फेम अभिनेता उत्कर्ष शिंदे या चित्रपटात सूर्याजी दांडकर ही भूमिका साकारणार आहे.
8/9

महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा या चित्रपटात दत्ताजी पागे ही भूमिका साकारत आहे.
9/9

अभिनेता जय दुधाणेला बिग बॉस सीझन 3 मुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तो तुळजा जामकर ही भूमिका साकारत आहे.
Published at : 03 Nov 2022 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
आयपीएल
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
