बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आज मुंबईत 'भामला फाउंडेशन' या पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटनेसोबत जोडला गेला आहे.
2/8
बई सारख्या शहरांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. त्यामुळे ऑक्सीजनचीदेखील कमतरता भासते. अचानक हिरवळ कमी होत असल्याची चिंता टायगर श्रॉफने व्यक्त केली आहे.
3/8
मागील 25 वर्ष पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रांत 'भामला फाउंडेशन' कार्य करीत आहे. शहरातील हिरवळ वाढवण्यासाठी वृक्षारोपणाची मोहिम संस्थेतेने हाती घेतली आहे.
4/8
या नव्या मोहिमेचा टायगर श्रॉफ ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. त्यामुळेच टायगर मुंबईत आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
5/8
टायगर श्रॉफ कार्यक्रमात म्हणाला,"या भूमीची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासायला लागली आहे. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.
6/8
अनेक छोटे बदल समाजात परिवर्तन घडवण्यास कारणीभूत ठरत असतात. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासोबत समाजात बदल घडवला पाहिजे.
7/8
भामला फाउंडेशन'चे एरिक सोल्हम म्हणाले, जगभरातील हिरवळ वाचवण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करायला हवे". त्यांनी जगभरातील दुर्लक्षित जंगले, वाढती दुर्गंधीवरदेखील लक्ष केंद्रित केले. जगभरातील पर्यावरणाला वाचवण्यासाठी त्यांनी पाऊले उचलण्याचे आश्वासनदेखील दिले.
8/8
यानिमित्ताने 'भामला फाउंडेशन'चे संस्थापक आसिफ भामला यांनी 25 वर्षात भामला फाउंडेशनने पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा माहिती दिली. तसेच शहरातील वृक्षतोडीवर खंत व्यक्त केली. जनजागृती करण्यासाठी पाऊले उचलले. टायगर श्रॉफमुळे लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.