एक्स्प्लोर
Sonali Kulkarni : 'भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत'; सोनालीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
नुकताच सोनालीचा (Sonali Kulkarni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे.
(Sonali Kulkarni/ instagram)
1/10

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
2/10

सोनालीच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.
3/10

नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे.
4/10

अमित श्रीवास्तव नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनालीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
5/10

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की सोनाली म्हणते, "भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?"
6/10

पुढे सोनाली म्हणाली, "अशा मुली घडवा ज्या समान वागणूक देतात. जे स्वत:साठी कमावत असेल. जी असं म्हणू शकेल की, घरात नवा फ्रिज घ्यायचा असेल तर अर्धे पैसे मी देईन."
7/10

सोनालीने समानता या विषयाबरोबरच इतर काही विषयांवर देखील भाष्य केलं आहे.
8/10

एका नेटकऱ्यानं सोनालीच्या व्हिडीओला कमेंट केली, 'खूप छान बोलली.'
9/10

देऊळ, सिंघम, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगा बाई अरेच्या 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये सोनालीने काम केलं.
10/10

काटा रुते कुणाला, तमन्ना, काली - एक अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये देखील सोनालीनं काम केलं आहे.
Published at : 16 Mar 2023 03:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
























