'तेरे चेहरे में वो जादू है तेरी ओर चला आता हूं' नोरा फतेही (Nora Fatehi)वर या गाण्याच्या ओळी अगदी अचूक बसतात. (Photo Credit -Instagram)
2/8
लोकं तिला आणि तिच्या सौंदर्यतेला भुलून जातात. नोरा कुठेही जाते तेव्हा तिच्या सौंदर्याची आणि स्टाइलची खूप चर्चा होत असते. (Photo Credit -Instagram)
3/8
नोराची खास गोष्ट आहे की, तिला तिच्या चमकणाऱ्या त्वचेसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. उलट खूप सोप्या पद्धतींचा वापर करून ती स्वत:ला दोन मिनटात तयार करते. (Photo Credit -Instagram)
4/8
नोरा चेहऱ्यावर लावायला दोन वेगळ्या शेड्स असलेल्या फाउंडेशनचा वापर करते. एक लाईट आणि एक डार्क. हे दोन्ही फाउंडेशन एकत्र करून लावल्याने एक परफेक्ट बेस नोरा फतेहीला मिळतो. (Photo Credit -Instagram)
5/8
हा परफेक्ट बेस तिच्या चमकत्या त्वचेचं रहस्य आहे. जो नोराला मॅट आणि सॉफ्ट लूक देतो. नोरा रोज याच पद्धतीचा मेकअप वापरते. (Photo Credit -Instagram)
6/8
नोरा तिचा लूक बऱ्याचदा लाईट शेड लिपस्टिकने पूर्ण करते. तिच्या पर्समध्ये चेहऱ्यावर लावायला पावडर आणि लाइट गुलाबी रंगाची लिपस्टिक नेहमी असते. (Photo Credit -Instagram)
7/8
नोराच्या सौंदर्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे तिचा आहार. नोरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कोणतेही स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत नाही. उलट तिच्या मनात जेव्हा जे येईल तेव्हा ती खात असते. आवडीचं खाल्लेल्याचा आनंद नेहमी तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो. (Photo Credit -Instagram)
8/8
नोरा ही उत्कृष्ट डान्सर असल्यानेच एवढी फिट आहे. नोरा बेली डान्स करत असल्याने तिला खास व्यायाम करायची गरज पडत नाही. (Photo Credit -Instagram)