बॉलिवूडमध्ये खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांना अल्पावधीत यश मिळते. पण अचानक मिळालेल्या यश प्रत्येकालाच राखता येतं असं नाही. फिल्म इंडस्ट्रीची अशीच एक अभिनेत्री आहे आयशा टाकिया.
2/6
आयशा टाकियाने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तिने सलमान खानसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. आयशाचा 'वॉंटेड' मधील अभिनयही प्रेक्षकांना आवडला होता आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
3/6
आयशा टाकियाने बाल कलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. 90 च्या दशकात ती एका जाहिरातीमध्ये दिसली होती. आयशाने आपलं सौदर्य आणि निरागसपणाने प्रेक्षकांना वेड लावलं.
4/6
मोठी झाल्यानंतर आयशाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. फाल्गुनी पाठक यांनी गायलेल्या 'मेरी चुनर उड़-उड़ जाए' या गाण्यातही ती दिसली.
5/6
चित्रपटांमध्ये आपली कारकीर्द संपुष्टात येत असल्याचे पाहून आयशा टाकिया बॉलिवूडपासून दूर गेली. तिने फरहान आझमीशी लग्न केले होते. फरहान हा एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहे.
6/6
मीडिया रिपोर्टनुसार, आयशाने चेहर्यावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र, दुर्दैवाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि तिच्या चेहऱ्याचे नुकसान झाले. त्यानंतर तिचं बॉलिवूडमध्ये कमबॅक होणे अशक्य होऊन गेलं.