एक्स्प्लोर
अभिनयासोबतच Ranvir Shoreyचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत; 'या' अभिनेत्रीनं केलेला मारहाणीचा आरोप
Ranvir Shorey
1/9

आज बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याचा वाढदिवस. 18 ऑगस्ट, 1972 मध्ये जालंधरमध्ये रणवीरचा जन्म झाला. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
2/9

1997 मध्ये रणवीरनं वीजे (व्हिडीयो जॉकी) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र, अभिनयात काम करण्याची इच्छा झाली आणि त्यानं अभिनयात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
3/9

रणवीर शौरीनं 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक छोटी सी लव स्टोरी' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
4/9

रणवीरनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याला खरी ओळख मिळाली ती, 2007 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला मधुर भंडारकर दिग्दर्शित 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटातून. या चित्रपटात रणवीर शौरीशिवाय कुणाल खेमू, नीतू चंद्रा आणि कोंकणा सेन हे मुख्य भूमिकेत होते. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
5/9

आपल्या अभिनयाच्या जोरावर रणवीरनं बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळंही रणवीर खूप चर्चेत राहिला. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
6/9

रणवीरचं नाव अभिनेत्री पूजा भट्टसोबतही जोडलं गेलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघं काही काळ एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. पूजा भट्टनं रणवीरवर मारहाण केल्याचाही आरोप केला होता. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
7/9

त्यानंतर रणवीर शौरीचं नाव अभिनेत्री कोंकणा सेनसोबत जोडण्यात आलं होतं. दोघांनी लग्नही केलं होतं. पण काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दोघांना एक मुलगा आहे. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
8/9

रणवीर शौरीनं जिस्म, लक्ष्य, प्यार के साइड इफेक्ट्स, खोसला का घोसला, सिंह इज किंग, चांदनी चौक टू चाइना आणि एक था टायगर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (PHOTO : @ranvirshorey/facebook)
9/9

(PHOTO : @ranvirshorey/facebook)
Published at : 18 Aug 2021 11:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
























