एक्स्प्लोर
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 23-24 तारखेला उदयपूरमध्ये सोहळा
Raghav Chadha and Parineeti Chopra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोघे उदयपूरमध्ये लग्नबंधतान अडकणार आहेत.

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding
1/9

या जोडप्याच्या या दिमाखदार विवाह सोहळ्यात अनेक मोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी सहभागी होणार आहेत.
2/9

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह सप्टेंबर महिन्यातच पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थानची निवड केली आहे.
3/9

दरम्यान, लग्नाच्या तारखेबाबत दोघांनाही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
4/9

मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव यांचा लग्न सोहळा 23-24 सप्टेंबरला पार पडणार आहे.
5/9

यामध्ये 23 सप्टेंबरला मेहेंदी, हळदी आणि संगीत यासह अनेक कार्यक्रम असतील. त्यानंतर 24 सप्टेंबरला लग्न होणार आहे.
6/9

राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये हा शानदार विवाह सोहळा पार पडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
7/9

परिणीती आणि राघव यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला होता आणि आता त्यांचं लग्न होणार आहे.
8/9

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
9/9

पंजाबमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असताना परिणीती राघव चड्ढा यांना पहिल्यांदा भेटली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं
Published at : 05 Sep 2023 09:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
