एक्स्प्लोर
Govinda Net Worth : अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर, तरही जगतो लक्झरी लाईफ; अभिनेता गोविंदाची कमाई कुठून होते?
Govinda Luxury Life : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर आहे, तरीही तो लक्झरी लाईफ जगतो. त्याच्या कमाईचं नेमकं साधन काय? ते जाणून घ्या.
Bollywood Actor Govinda's Net Worth Luxury Life
1/12

90 च्या दशकात अभिनेता गोविंदाने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली. त्याच्या डान्स आणि अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
2/12

गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा चित्रपटांपासून दूर आहे. 2019 मध्ये आलेल्या रंगीला राजा चित्रपटात तो झळकला, त्यानंतर त्याने कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही.
3/12

गोविंदाने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असला तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
4/12

गोविंदा नेहमी त्याच्या चाहत्यांसोबत फोटो आणि वैयक्तिक आयुष्याबाबतचे अपडेट शेअर करत असतो.
5/12

गोविंदा अलिकडे कोणत्या चित्रपटात झळकला नसला, तरी तो लक्झरी लाईफ जगतो. त्याच्या कमाईचं नेमकं साधन काय? ते जाणून घ्या.
6/12

गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये 'हीरो नंबर वन', 'दुल्हे राजा', 'आंटी नंबर वन', 'राजा बाबू', 'कर्ज', 'स्वर्ग', 'शोला और शबनम' यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
7/12

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आज 160 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे, त्याने चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या साईड बिझनेसमधून मोठी कमाई केली आहे.
8/12

गोविंदा चित्रपटांपासून दूर राहिल्यापासून प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतो.
9/12

मुंबईत गोविंदाची एक नाही तर तीन घरे आहेत. याशिवाय त्याची अमेरिकेतही मालमत्ता आहे.
10/12

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाचे रायगडमध्ये एक आलिशान फार्महाऊस देखील आहे.
11/12

प्रॉपर्टीशिवाय अभिनेता गोविंदा हॉटेल्स आणि इतर व्यवसायांतूनही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
12/12

गोविंदा त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट आणि रिॲलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारून खूप कमाई करतो
Published at : 23 Jul 2024 11:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























