एक्स्प्लोर
PHOTO : बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’चं 75व्या वर्षात पदार्पण! वाचा हेमा मालिनी यांच्याबद्दल खास गोष्टी...
'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Hema Malini
1/8

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा आज 74वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.
2/8

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमुल्य योगदान दिले आहे. बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. रुपेरी पडद्यासोबतच त्या राजकारणी म्हणूनही खूप सक्रिय आहेत.
3/8

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1961मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपट 'तपंडव वनवासन'मध्ये हेमा मालिनी यांनी एका नर्तिकेची भूमिका साकारली होती.
4/8

आजघडीला हेमा मालिनी केवळ हिंदी चित्रपटांच्या अभिनेत्री म्हणूनच नाही तर, एक राजकारणी म्हणून देखील ओळखल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
5/8

'सपनो का सौदागर' हा हेमा मालिनी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट 1968 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राज कपूर झळकले होते. या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
6/8

या चित्रपटानंतर हेमा मालिनी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हेमा मालिनी आपल्या सर्वच चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय करत प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवलं होतं.
7/8

‘शोले’ चित्रपटातील ‘बसंती’ या भूमिकेतही हेमा मालिनी यांना प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. या चित्रपटानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यांची ही प्रेमकहाणी चांगलीच गाजली होती.
8/8

अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या चित्रपटांपासून दूर असून, राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 2004मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Photo : @dreamgirlhemamalini/IG)
Published at : 16 Oct 2022 09:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
