एक्स्प्लोर
Dilip Kumar Love Story : ...जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात दिली होती मुधबाला यांच्यावरील प्रेमाची कबुली!
Dilip Kumar
1/6

हिंदी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर म्हणजे, दिलीप कुमार. बॉलिवूडमधील First Khan ने आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 98व्या वर्षी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. दिलीप कुमार यांच्या फिल्मी कारकिर्दीसोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत होतं. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत दिलीप कुमार यांचं आजही नाव जोडलं जातं. पत्नी सायरा बानो आणि त्यांची केमिस्ट्रीमुळे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये त्यांचा समावेश केला जात असे. पण सायरा बानो यांच्याआधी दिलीप कुमार यांचं मधुबालाशी असलेलं नातं सर्वश्रुत आहेच. असं सांगण्यात येतं की, मधुबाला यांच्या वडिलांनी नकार दिल्यामुळे त्यांचं आणि दिलीप कुमार यांचं लग्न होऊ शकलं नाही. परंतु, हे लग्न न होण्यामागच्या कारणाचा खुलासा दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून केला होता.
2/6

अभिनेत्री मधुबाला यांचे वडील एक प्रोडक्शन कंपनी चालवत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की, लग्नानंतर दिलीप कुमार आणि मधुबाला यांसारखे दोन दिग्गज तारे त्यांच्या प्रोडक्शनसाठी काम करतील. पण, दिलीप कुमार यांचं म्हणणं होतं की, त्यांच्या काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. असं म्हणतात की, याबाबत मधुबाला यांचे वडील आणि दिलीप कुमार यांच्या वादही झाले होते.
Published at : 07 Jul 2021 01:09 PM (IST)
आणखी पाहा























