एक्स्प्लोर
In Pics | पाहा प्रियांकाचं आलिशान रेस्तराँ SONA आणि तेथील भारतीय मेन्यू

Feature_Photo
1/8

चित्रपट निर्मितीमध्ये आपलं नशिब आजमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता रेस्तराँ व्यवसायातही उतरली आहे. नुकतंच तिनं तिच्या नव्या हॉटेलची झलक सर्वांच्या भेटीला आणत तेथील मेन्यूही सर्वांपुढं सादर केला.
2/8

न्यूयॉर्कमध्ये 'देसी गर्ल'नं 'सोना' या नावानं रेस्तराँ सुरु केलं असून, भारतीय धाटणीचे खाद्यपदार्थ हे या ठिकाणचे विशेष असणार आहे.
3/8

कोफ्ता कोर्मापासून ते चीझ नान आणि तोंडाला पाणी आणण्याऱ्या असंख्य पदार्थांची रेलचेल 'सोना'मध्ये असणार आहे.
4/8

खुद्द प्रियांकानंच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या या नव्या व्यवसायाची माहिती सर्वांना करुन दिली.
5/8

या ठिकाणी भारताचं स्मरण होणार असून, आपलं बालपण ज्या देशात गेलं त्या ठिकाणची चव इछं चाखालया मिळेल असंही तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटलं.
6/8

या नव्या सुरुवातीसाठी आपल्याया मदत करणाऱ्या सर्वांचेच प्रियांकाने आभार मानले. सोबतच तिनं 'सोना' हे नाव कसं पडलं हेसुद्धा सांगितलं.
7/8

प्रियांकाच्या पतीनं म्हणजेच निक जोनास याने हे नाव सुचवलं. सोना, म्हणजेच सोनं... आपल्या लग्नापासूनच हा शब्द निकच्या अनेकदा कानी पडला होता अशी मजेशीर आठवणही तिनं कॅप्शनच्या माध्यमातून सांगितली.
8/8

( सर्व छायाचित्र- प्रियांका चोप्रा- इन्स्टाग्राम )
Published at : 27 Mar 2021 07:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
सातारा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
