एक्स्प्लोर
PHOTO: या कारणामुळे अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती!
Bigg Boss 17
1/9

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
2/9

अंकितासह तिचा पती विकी जैनदेखील (Vicky Jain) 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाला आहे. अंकिता लोखंडेमुळे 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे.
3/9

अभिनेत्री कधी प्रेग्नंट असल्याचा दावा करते तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करते. त्यामुळे कार्यक्रमाचा टीआरपी वाढतो. आता अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचं कारण सांगितलं आहे.
4/9

'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा अंकिताला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5/9

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मुनव्वर फारुकीसोबत सुशांतच्या अंत्यसंस्काराबद्दल भाष्य करताना दिसत आहे. मुनव्वर अंकिताला एक शायरी ऐकवतो. त्यानंतर अभिनेत्री 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातील गाणं गुणगुणायला सुरू करते.
6/9

अंकिताने 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातील गाणं गायल्यानंतर मुनव्वरला आनंद होतो. अंकिताला तो म्हणतो,"एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान मी सुशांतला भेटलो होतो". त्यानंतर अंकिता भावूक होत म्हणते,"सुशांत माणूस म्हणून खूप चांगला होता. आता तो या जगात नाही हे स्वीकारायला खूप वेळ लागला.
7/9

अंकिता पुढे म्हणते,"सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. एखाद्याला गमवायची माझी ती पहिलीच वेळ होती. सुशांतच्या निधनाचा मला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारालाही मी गेले नाही. मला ते सहनच झालं नसतं. त्यावेळी विकीने मला जायला सांगितलं होतं. पण माझी हिंमत झाली नाही. सुशांतला त्या अवस्थेत मी पाहूच शकले नसते".
8/9

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतची 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. मालिकेतील अर्चना-मानवच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही फुलत गेली.
9/9

आधी दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचं लग्न व्हावं अशी चाहत्यांची खूप इच्छा होती. पण रिलेशनशिपच्या काही वर्षांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली.
Published at : 21 Nov 2023 12:17 PM (IST)
आणखी पाहा























