2018- 2019 मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे
2/7
23 जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत.
3/7
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.
4/7
नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
5/7
अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
6/7
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमायशोवर तिकीटे उपलब्ध आहेत.
7/7
बुकमायशोवर तिकीट बुक करुन तुम्ही या संगीत मैफीलीचा आनंद घेऊ शकता.