एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करणार का? अमित शाहांनी थेट सांगितली भाजपाची भूमिका; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केलं आहे.
AMIT SHAH (फोटो सौजन्य- यूट्यूब)
1/6

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज (10 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपाने महिला, तरुण, शेतकरी अशा सर्वच घटकांसाठी आकर्षक आश्वासनं दिली आहेत.
2/6

या जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, याच जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीनंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यावर भाष्य केलं आहे.
3/6

वेळ पडल्यास निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना सरकार स्थापनेसाठी सोबत घेणार का? असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. यावर बोलताना कोणतेही किंतुपरंतु नाही आहे. आमचं सरकार येणार आणि महायुतीचं सरकार येणार आहे, असं अमित शाह म्हणाले.
4/6

दरम्यान, भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिली जाणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत 2100 रुपये करण्यात येईल.
5/6

25000 महिलांचा महिला पोलीस दलात समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12000 रुपयांवरून 15000 रुपये देण्यात येतील.
6/6

हमीभावासाठई भावांतर योजना राबवण्यात येईल. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.
Published at : 10 Nov 2024 12:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























