एक्स्प्लोर
Mira Road Crime: इतकं निर्दयी कोणी कसं होऊ शकतं? हत्या करून लिव्ह इन पार्टनरचे तुकडे कुकरमध्ये अन् मिक्सरमध्ये...
मिरारोड मध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे.

Mira Road Crime
1/9

Mira Road Crime News: मिरारोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे.
2/9

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायच. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा.
3/9

गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केली. तसेच, आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीवर कलम भादवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4/9

मनोज साने असं या 56 वर्षांच्या नराधमाचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला 32 वर्षांची होती. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
5/9

मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
6/9

मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मिरा रोड च्या गीता आकाशदीप येथे राहत होते.
7/9

घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा हा खुलासा झाला.
8/9

आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचा आधी जीव घेतला. त्यानंतर कटर मशीनच्या मदतीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे कुकुरमध्ये टाकून शिजवले आणि त्यानंकर मिक्सरमध्ये बारीक केले.
9/9

नराधम मनोजनं हे कृत्य नेमकं का केल? सरस्वतीसोबत तो इतका निर्दयी आणि क्रूर कसा काय झाला? याबाबत मात्र अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
Published at : 08 Jun 2023 11:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रीडा
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
