एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
World’s Billionaires List 2021: फोर्ब्सकडून जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर, पहा कोण कितव्या स्थानी
संपादित छायाचित्र
1/11

सन 2021 साठी फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली आहे. या यादीनुसार जगभरात कोरोनाच्या महामारीनंतरही हे वर्ष अब्जाधीशांसाठी विशेष राहीलं आहे. यावर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत 5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या मते, यावर्षी क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे, फोर्ब्स 35 व्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी वाढली आहे. मागील वर्ष 2020 च्या यादीतील 8 ट्रिलियन डॉलरमध्ये 5 ट्रिलियन वाढ झाली आहे, जी यावर्षी एकूण 13.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. यावर्षी, फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये 493 नवीन लोक दाखल झाले आहेत.
2/11

अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यादीनुसार, जेफ बेजोस यांची संपत्ती 177 अब्ज डॉलर्स आहे. अॅमेझॉनच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी त्यांची एकूण मालमत्ता 64 अब्ज डॉलर्स होती.
3/11

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत एलोन मस्क दुसर्या क्रमांकावर आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये 705% वाढीसह ते 151 अब्ज डॉलर्ससह जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती झाला आहे.
4/11

फ्रेंच लक्झरी वस्तू टायकून बर्नार्ड अर्नाल्ट फोर्ब्सच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहेत. LVMH च्या शेअर्समध्ये 86% वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. जी एका वर्षापूर्वीच्या 76 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे
5/11

या यादीत बिल गेट्स चौथ्या स्थानावर आहे. बिल गेट्स यांची एकूण मालमत्ता 124 अब्ज डॉलर्स आहे. बिल गेट्स यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट, कॅनेडियन नॅशनल रेल्वे आणि ट्रॅक्टर निर्माता डीरे अॅन्ड कंपनीचे शेअर्स आहेत.
6/11

या यादीतील पाचव्या स्थानावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे नाव आहे. यावर्षी त्याच्या संपत्तीत 80 टक्के वाढ झाली आहे. यामुळे त्यांची मालमत्ता मागील वर्षी 42.3 अब्ज डॉलरवरून थेट 97 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे.
7/11

सहाव्या स्थानावर वॉरन बफे आहेच, जे बर्कशायर हॅथवेचे मालक आहेत, ज्यांना 'ओरेकल ऑफ ओमाहा' म्हणून ओळखले जाते. त्यांची एकूण मालमत्ता 96 अब्ज डॉलर्स आहे.
8/11

या यादीतील सातव्या क्रमांकावर सॉफ्टवेअर कंपनी ओरेकलचे अध्यक्ष लॅरी एलिसन आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 93 अब्ज डॉलर्स आहे.
9/11

त्याच वेळी, गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज (लॉरेन्स एडवर्ड पेज) यांनी 91.5 अब्ज डॉलर्ससह हे आठवे स्थान पटकावले आहे.
10/11

गूगलचे दुसरे सह-संस्थापक सर्गी ब्रिन 89 अब्ज डॉलर्ससह या यादीत नवव्या स्थानावर आहे.
11/11

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या यादीत दहावे स्थान मिळविले आहे. यासह मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांची अंदाजे संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
Published at : 07 Apr 2021 04:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
नाशिक
क्राईम
























