एक्स्प्लोर
हा आठवडा तुम्हाला करणार मालामाल, मोठा परतावा मिळवण्याची नामी संधी!
आगामी आठवड्यात अनेक शेअर्स एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याची चांगली संधी आहे.

share market (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

या आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्श एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. त्यामुळे शेअर्स एक्स डिव्हिडेंड होण्याआधी तुम्ही पैसे गुंतवून चांगली कमाई करू शकता. या पूर्ण आठवड्यात 80 पेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत.
2/7

5 ऑगस्ट (सोमवार): पहिल्या दिवशी अॅलेम्बिक, आंध्र पेपर, बर्जर पेंट्स इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रिज, चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, गांधी स्पेशल ट्यूब्स, ग्रीनप्लाई इंडस्ट्रीज, हर्क्यूलिस होस्ट्स, लिंडे इंडिया, मेनन पिस्टन्स, ऋषिरूप आणि सोमानी सेरॅमिक्स हे शेअर्स एक्स डिव्हिडेंड होतील.
3/7

6 ऑगस्ट (मंगळवार): मंगळवारी एक्स डिव्हिडेंड होणाऱ्या शेअर्समध्ये बाल्टीबॉय, बॉम्बे ऑक्सीजन इन्वेस्टमेंट्स, फर्मेंटा बायोटेक, ग्रासिम इंडस्ट्रीज, आयपीसीए लॅबोरेटरीज, एलटी फूड्स, मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया), ओरियंटल अॅरोमऍटिक्स, टीसीआय एक्स्प्रेस, टी डी पॉवर सिस्टम्स, उषा मार्टिन आणि वेस्ट कोस्ट पेपर मिल्स यांचा समावेश आहे.
4/7

7 ऑगस्ट (बुधवार): यादिवशी 360 वन डब्ल्यूएएम, भारती एयरटेल, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कॅस्ट्रॉल इंडिया, आयशर मोटर्स, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, गॅब्रियल इंडिया, इन्फीबीम अवेन्यूज, मिंडा कॉर्पोरेशन, एनटीपीसी, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, टूरिज्म फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, व्हिंटेज कॉफी अँड बेव्हरेजेज या शेअर्सचा समावेश आहे.
5/7

8 ऑगस्ट (गुरुवार): गुरुवारी फक्त तीन शेअर हे एक्स-डिव्हिडेंड होतील. यामध्ये इकोप्लास्ट, राइट्स लिमिटेड आणि सीलमॅटिक इंडिया लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.
6/7

9 ऑगस्ट (शुक्रवार): आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 40 शेअर एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत. यामध्ये एल्केम लॅबोरेटरीज, अरविंद फॅशन, आस्क ऑटोमोटिव्ह, बी अँड ए पॅकेजिंग इंडिया, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्प, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, ब्लॅक रोज इंडस्ट्रीज, बीपीसीएल, सीएट, सिटी यूनियन बँक, एंड्योरन्स टेक्नोलॉजीज, इक्विटास स्मॉल फायानान्स बँक, हिंडाल्को इंडस्ट्रीज, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन (एचपीसीएल), इंडॅग रबर, इंटरनेशनल ट्रॅव्हल हाउस, जम्मू अँड काश्मीर बँक, जेके लक्ष्मी सीमेंट, जॉइंड्रे कॅपिटल सर्विसेज, कल्याण ज्वेलर्स इंडिया, केसी इंडस्ट्रीज, केईसी इंटरनॅशनल, कोल्टे-पाटिल डेव्हलपर्स, केपीआयटी टेक्नोलॉजीज, मफतलाल इंडस्ट्रीज, मॅग्ना इलेक्ट्रो कास्टिंग्स, मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, नाथ बायो-जीन्स (इंडिया), नेटवेब टेक्नोलॉजीज इंडिया, क्यूजीओ फायनान्स, द रामको सीमेंट्स, रामको इंडस्ट्रीज, आरयसी, आर के स्वामी, स्पोर्टकिंग इंडिया, ताज जी व्ही केवी हाँटल्स अँड रिसॉर्ट्स, तेगा इंडस्ट्रीज, वैभव ग्लोबल, वरुण बेवरेजेज, वंडरला हॉलीडेज यांचा समावेश आहे.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 04 Aug 2024 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
पुणे
रत्नागिरी
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
