एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Share Market : तेजीनंतर सेन्सेक्स 775 अंकांनी कोसळला, निफ्टी 50 निर्देशांक घसरला, अमेरिका कनेक्शन समोर
Stock Market Today: सेन्सेक्समध्ये सोमवारी 271 अंकांची घसरण झाली होती. मूडीजनं अमेरिकेचं रेटिंग घटवल्याचा परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.
शेअर बाजारात घसरण
1/6

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजार सुरु असलेली घसरण आज थोड्या वेळासाठी थांबली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्स मध्ये 775 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 81283.84 वर पोहोचला होता. निफ्टी 50 मध्ये 241 अंकांची घसरण झाली. निफ्टी 50 निर्देशांक 24701.65 अंकांवर पोहोचला.
2/6

शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सेन्सेक्स 271 अंकांनी घसरला. तर, आज सेन्सेक्स 775 अंकांनी घसरला आहे. मूडीजनं अमेरिकेचं रेटिंग घटवल्याचा परिणाम जागतिक पातळीवर दिसून आला आहे. जागतिक बाजारातील कमजोर संकेतामुळं आयटी, बँक, फार्मा आणि ऑटो स्टॉक्समध्ये घसरण झाली.
3/6

इटर्नल, इन्फोसिस, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंटस, एचसीएल टेक आणि आणि अदानी पोर्टसला नुकसान सहन करावं लागलं आहे. या कंपन्यांचे शेअर घसरले.
4/6

पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, एनटीपीसी, भारतीय स्टेट बँक, इंडसइंड बँकच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. लेमन मार्केट डेस्कचे विश्लेषक गौरव गर्ग यांनी कमजोर आर्थिक संकेत, आयटी कंपन्यांच्या शेअर मधील विक्री आणि वाढत्या अस्थिरतेमुळं बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
5/6

मूडीजनं अमेरिकेवरील 36000 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या हवाला देत रेटिंग एए1 केलं आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. यामुळं शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 20 May 2025 03:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















