एक्स्प्लोर
Share Market : सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला मात्र गुंतवणूकदारांनी 2.5 लाख कोटी कमावले, स्मॉल कॅप शेअरधारकांची जोरदार कमाई
Share Market : आयटी कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. मात्र, बीएसईचं बाजारमूल्य वाढल्याचं दिसून आलं.
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांची जोरदार कमाई
1/6

आयटी कंपन्यांच्या स्टॉक्सची विक्री झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 200 अंकांनी तर निफ्टी 50 निर्देशांक 42 अंकांनी घसरला. निफ्टी 50 निर्देशांक 25000 हजारांच्या पार राहण्यात यशस्वी ठरला. ब्रॉडर शेअर मार्केटचं चित्र वेगळं पाहायला मिळालं. कारण बीएसई स्मॉलकॅप 1.18 टक्के आणि मिडकॅप इंडेक्स 0.85 टक्क्यांनी वाढून बंद झाला.स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली.
2/6

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्य स्टॉक्समध्ये सलग सहाव्या दिवशी तेजी दिसून आली. रेल्वे, रिअल इस्टेट, ऊर्जा, कॅफिटल गुड्स आणि यूटिलिटी शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.5 लाख कोटींची वाढ झाली.
Published at : 16 May 2025 05:40 PM (IST)
आणखी पाहा























