एक्स्प्लोर
Closing Bell: दोन दिवसांच्या तेजीनंतर नफावसुली जोरात; दिवसभरातील उच्चांकानंतर सेन्सेक्स घसरला
Sensex Closing Bell: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी नफावसुलीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण झाली.
Closing Bell: दोन दिवसांच्या तेजीनंतर नफावसुली जोरात; दिवसभरातील उच्चांकानंतर सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला
1/9

दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारच्या सत्रात नफावसुली दिसून आल्याने बाजारात घसरण झाली.
2/9

दिवसभरातील उच्चांकापासून सेन्सेक्स 400 अंकांनी आणि तर निफ्टी 125 अंकांनी घसरला.
3/9

दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 210 अंकाच्या घसरणीसह 65,393 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 19,382 अंकांवर बंद झाला.
4/9

सेन्सेक्समधील 30 पैकी 7 कंपन्यांचे आणि निफ्टी 50 मधील 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
5/9

बँकिंग, आयटी, मेटल्स, एनर्जी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
6/9

फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली.
7/9

image 7
8/9

एशियन पेंट्स, सन फार्मा, नेस्ले आदींमध्ये तेजी दिसून आली. तर, इन्फोसिस, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
9/9

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 301.61 लाख कोटी इतके झाले. आजच्या व्यवहारात 30 हजार कोटींची वाढ नोंदवण्यात आली.
Published at : 12 Jul 2023 05:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























