एक्स्प्लोर
Credit Card: क्रेडिट कार्डचे हे छुपे फायदे माहीत आहेत का?
Credit Card: अनेकजण क्रेडिट कार्डच्या या फायद्याबाबत अनभिज्ञ असतात. जाणून घ्या क्रेडिट कार्डचे फायदे...

Credit Card: क्रेडिट कार्डचे हे छुपे फायदे माहीत आहेत का?
1/11

Credit Card Benefits: अनेकजण क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरतात. मात्र, त्याचे काही फायदे अनेकांना माहीत नसतात. सण-उत्सवाच्या काळात तुम्हाला क्रेडिट कार्डचे हे काही फायदे जाणून थोडा अधिक आर्थिक लाभ घेता येईल
2/11

क्रेडिट कार्डचा विचारपूर्वक आणि योग्यपणे वापर केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. जाणून घ्या क्रेडिट कार्डचे Hidden Benefits....
3/11

Welcome Offer: यामध्ये बहुतांशी बँक, क्रेडिट कार्ड देणाऱ्या वित्तीय संस्था वेगवेगळ्या प्रकारचे Welcome Benefits देतात.
4/11

गिफ्ट वाउचर, डिस्काउंट अथवा बोनस रिवॉर्ड पॉइंटच्या आधारे तुम्हाला फायदा मिळू शकतो.
5/11

Fuel Surcharge: जवळपास सर्वच क्रेडिट कार्डवर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात इंधन भरता, त्यावेळी तुम्हाला काही सवलत, रिवॉर्ड पॉईंट्स मिळू शकतात. मात्र, त्यासाठी एक ठाराविक रक्कम खर्च करावी लागेल.
6/11

रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक: जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग करता. त्यावेळी तुम्हाला अकाउंटमध्ये काही रिवॉर्ड पॉईंट्स अथवा कॅशबॅक मिळू शकतात. रिवॉर्डस पॉइंटचा वापर तुम्हाला भेटवस्तू अथवा एखादी वस्तू खरेदी करताना करू शकता. यामुळे तुमचे काही पैसे नक्की वाचतील.
7/11

तर, कॅशबॅकची रक्कम थेट तुमच्या कार्डमध्ये जमा होते. जर, तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्सच्याऐवजी एअर माइल्स वापरू शकता. त्याचा वापर तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंगसाठी करू शकता.
8/11

रोख रक्कम: तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून आणीबाणीच्या स्थितीत एटीएममधून रोख रक्कम काढू शकता. मात्र, क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढल्यास बँकांकडून व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे या पर्यायाचा वापर बँकेकडून माहिती घेऊन विचारपूर्वक करा.
9/11

विमा: क्रेडिट कार्ड विमा आणि अपघाताच्या प्रकरणात एक निश्चित रक्कमेपर्यंत कव्हर देतात. काही बँकांकडून विविध प्रकारचे विमा कवच दिले जाते. त्याची माहिती तुम्ही बँकेकडून घेऊ शकता.
10/11

एअरपोर्ट लाउंज एक्सेस: काही क्रेडिट कार्ड डोमेस्टीक विमानतळासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकदा अथवा अधिक वेळेस लाउंजमध्ये थांबण्याची ऑफर देतात. ट्रॅव्हल-सेंट्रिक क्रेडिट कार्ड आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड विशेषपणे या ऑफर देतात.
11/11
.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
EMI: जवळपास सर्वच क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डवर ईएमआयचा लाभ मिळू शकतो. यामुळे तुमची मोठ्या रक्कमेची बिले ईएमआयमध्ये बदलू शकता. त्यामुळे तुम्हाला एकदम मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
Published at : 24 Aug 2022 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
