एक्स्प्लोर
UPI : 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लागणार असल्याच्या चर्चा, केंद्र सरकारनं सर्व दावे फेटाळले, स्पष्टीकरण देत सांगितलं की...
UPI-GST : भारत सरकार 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या चर्चा निराधार असल्याचं वित्त मंत्रालयानं म्हटलं.
यूपीआय व्यवहारासंदर्भातील अफवा फेटाळल्या
1/5

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून २ हजारांपेक्षा जास्त युपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा विचार करत नाही, अशी माहिती दिली आहे. जीएसटी आकारण्यासंदर्भातील चर्चा केंद्रानं फेटाळल्या आहेत.
2/5

यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर जीएसटी लावण्याच्या अफवा संदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून खंडन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
3/5

यूपीआय व्यवहारांवर कर आकाराणीसंदर्भातील कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कर आकारणी संदर्भातील दावे तथ्यहीन असल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
4/5

30 डिसेंबर 2019 पासून Person‑to‑Merchant (P2M) व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) रद्द आहे; त्यामुळे UPI व्यवहारांवर सध्या GST लागूच नाही. डिजिटल पेमेंट्सला केंद्र सरकारकडून पाठबळ देण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
5/5

आर्थिक वर्ष 2021-22 ते 2023-24 दरम्यान लहान व्यापाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 1 हजार 389 कोटी, 2 हजार 210 कोटी आणि 3 हजार 631 कोटी वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published at : 18 Apr 2025 08:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























