एक्स्प्लोर
'या' बँकेची रेकॉर्डब्रेड कमाई, गुंतवणूकदारांना देणार डिव्हिडेंड
जम्मू आणि काश्मीर बँकेने गेल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या बँकेने आता आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

bank share dividend (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

देशातील अनेक बँकांनी आपल्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध केले आहेत. गेल्या तिमाहीत अनेक बँकांना रेकॉर्डब्रेक नफा झाला आहे.
2/6

यामध्ये जम्मू आणि काश्मीर बँकेचा समावेश आहे. या बँकेनेही रेकॉर्डब्रेक नफा नोंदवला असून आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड (लाभांश) जाहीर केला आहे.
3/6

जम्मू आणि काश्मीर बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1,767 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात साधारण 48 टक्क्यांची वाढ झाली आहे.
4/6

या बँकेने मिळवलेला आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा नफा आहे. हा नफा मिळवल्यानंतर बँकेने आपल्या ग्राहकांना 236.75 कोटी रुपये डिव्हिडेंडच्या रुपात देण्याची घोषणा केली आहे.
5/6

या बँकेने 1 रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरमागे 2.5 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
6/6

या बँकेचे एकूण उत्पन्न 5,502.09 कोटी रुपये होते. आता यात 10 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 6,029.17 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
Published at : 05 May 2024 05:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
