एक्स्प्लोर
Indian Railways: प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यास रेल्वे स्टेशनवर दिवसभर थांबता येतं का? भारतीय रेल्वेचा महत्त्वाचा नियम काय सांगतो?
Indian Railway Rules: जेव्हा तुम्हाला मित्रांना किंवा नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जायचं असतं तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागतं. ते कितीवेळ वैध असतं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

भारतीय रेल्वे
1/5

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम बनवले आहेत. त्यापैकी प्लॅटफॉर्म तिकीटासंदर्भातील नियम महत्त्वाचा आहे.
2/5

Platform Ticket Rules: दररोज रेल्वेनं कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. या प्रवासात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेनं काही नियम बनवले आहेत. एखादा व्यक्ती आपल्या नातेवाईकाला, मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असेल तर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
3/5

जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट न काढता रेल्वे स्टेशनवर गेला तर तुम्हाला अशा परिस्थितीत दंड द्यावा लागेल. रेल्वेच्या नियमानुसार प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वेस्टेशनच्या आत प्रवेश करता येणार नाही.
4/5

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट अनिवार्य केलं आहे. अनेकदा लोकांना आपण प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर किती वेळ रेल्वे स्टेशनवर थांबता येईल, असा प्रश्न असतो. अनेकांना प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर संपूर्ण दिवस आपण स्टेशनवर थांबू शकतो, असं वाटतं मात्र नियम वेगळा आहे.
5/5

प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 10 रुपये असते. हे तिकीट पूर्ण दिवसासाठी वैध नसतं ते केवळ दोन तासांसाठी वैध असतं. जर, तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय रेल्वे स्टेशनवर आढळून आला तर तुम्हाला 250 रुपये दंड द्यावा लागेल.
Published at : 24 Aug 2024 07:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
