एक्स्प्लोर
Gautam Adani New Car Collection: गौतम अदानींच्या गाड्यांचे नवीन कलेक्शन, सर्वांच्या किमती करोडोंमध्ये
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्याकडे कोटींची संपत्ती आहे. अदानींकडे नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक कार आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

Gautam Adani
1/6

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर 36व्या क्रमांकावर आले आहेत. तरी, ते सध्या जगातील 24वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
2/6

गौतम अदानी यांच्या लाइफस्टाइलबद्दल बोलायचे झाले तर ते लक्झरी लाइफ जगतात. कोट्यवधींच्या मालमत्तेशिवाय त्यांच्याकडे आलिशान घरे आणि गाड्यांचा चांगला संग्रह आहे.
3/6

अदानींच्या नवीन कलेक्शनमध्ये Rolls Royce Ghost कार देखील आहे. गौतम अदानी यांची ही कार प्रीमियम लक्झरी कार आहे. 6.95 कोटी रुपयांना त्यांनी ही विकत घेतली होती. ती 4.8 सेकंदात 100 किमी/तास या वेगाने धावते आणि 250 किमी प्रतितास या वेगाने प्रवास करु शकते.
4/6

BMW 7-Series ही भारतातील लक्झरी मार्केटमधील आघाडीच्या कारपैकी एक आहे. त्याची किंमत 1.70 कोटी रुपयांपासून सुरू होते. त्यांच्याकडे टोयोटा वेलफायर देखील आहे, जिची एक्स-शोरूम किंमत 95 लाख रुपये आहे.
5/6

गौतम अदानींकडे Land Rover‘s Range Rover ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित लाँग व्हीलबेस कार आहे. ही सात सीटर कार आहे. ती त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये विकत घेतली होती, त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.
6/6

गौतम अदानीकडे Audi Q7 कारच्या दोन सिरीज आहेत. त्याची किंमत 80 लाख रुपयांपासून सुरू होते. अदानीकडे जुनी फेरारी कॅलिफोर्निया देखील आहे, ज्याची किंमत 3.15 कोटी रुपये आहे.
Published at : 07 May 2023 04:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
