एक्स्प्लोर
Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफचं अस्त्र, आता टाटा ग्रुपच्या उपकंपनीचा मोठा निर्णय, अमेरिकेला होणारी निर्यात बंद
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. भारतावरील टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत.
टॅरिफनंतर टाटांच्या एका कंपनीचा मोठा निर्णय
1/5

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला विविध देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. अमेरिकेनं भारतावर 26 टक्के टॅरिफ लादलं आहे. यानंतर टाटा ग्रुपची उपकंपनी जग्वार लँड रोवरनं कठोर निर्णय घेतला आहे.
2/5

टाइम्सच्या रिपोर्टनुसार जग्वार लँड रोवरनं ब्रिटनमध्ये बनवण्यात आलेल्या गाड्यांची अमेरिकेला होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय़ घेतला आहे. जग्वार लँड रोवर ही ब्रिटनमधील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी आहे.
3/5

अमेरिकेनं कारच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 2 एप्रिलपासून लागू झाला आहे. जग्वार लँड रोवरचा हा निर्णय ट्रम्प टॅरिफवरुन मार्ग काढण्याचा प्रयत्न मानला जातोय.
4/5

जग्वार लँड रोवर ब्रिटनमध्ये 38 हजार लोकांना रोजगार देणारी कंपनी आहे. या कंपनीनं गेल्या दोन महिन्यापूर्वीच अमेरिकेला जी निर्यात करायची होती ती पूर्ण केली आहे.
5/5

जग्वार लँड रोवरनं त्यांचा ब्रँड हा आंतरराष्ट्रीय असल्याचं म्हटलं. आमचा बिझनेस कोणत्या एका गोष्टीवर आधारित नाही. मार्केटच्या बदलत्या स्थितीची आम्हाला जाण आहे. मार्च 2024 पासू गेल्या 12 महिन्यात 4,30,000 गाड्यांची विक्री केली आहे. यापैकी 25 टक्के गाड्यांची विक्री उत्तर अमेरिकेत करण्यात आली होती.
Published at : 05 Apr 2025 10:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























