बी- टाऊनचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेता हृतिक रोशन याच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. या चर्चेमध्ये ओघाओघानं अभिनेत्री कंगना राणौत हिचंही नाव पुढं येत आहे. चर्चेस निमित्तं ठरत आहेत ते म्हणजे या दोन्ही कलाकारांमध्ये असणारे वाद. यादरम्य़ानच हृतिकला मुंबईत फिरताना पाहिलं गेलं. यावेळी माध्यमांसमोर येताच त्यानं अनोख्या अंदाजात सर्वांचंच लक्ष वेधलं. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
2/7
यावेळी आपल्या कारमधून हृतिकनं माध्यमं आणि चाहत्यांना हात उंचावत अभिवादन केलं. अशा पद्धतीनं तो बऱ्याच दिवसांनंतर सर्वांसमोर आला. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
3/7
2016 मध्ये कंगनानं हृतिकविरोधात जी एफायआर दाखल केली होती, त्याच्या तपासाची जबाबदारी आता सायबर सेलकडून क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्याच वादानं डोकं वर काढलं आहे. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
4/7
मुख्य म्हणजे या चर्चांना सुरुवात होत नाही, तोच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिनंही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
5/7
ट्विट करत कंगनानं लिहिलं, 'पुन्हा एकदा हीच कहाणी सुरु झाली आहे. आमचं ब्रेकअप आणि त्यांचा घटस्फोट होऊनही तो पुढे जाऊ इच्छित नाही. खासगी जीवनात काहीतरी मिळवण्याच्या इच्छेनं मी जशी सारं धैर्य एकवटते तसं लगेचच यांचं नाटक सुरु होतं. हृतिक आता त्या प्रेमप्रकरणासाठी कधीपर्यंत रडणार...’ (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
6/7
कंगनाचं हे ट्विट आणि या वादाला मिळालेली हवा पाहता पुढील काही दिवसांमध्ये कलाविश्वात पुन्हा एकदा याचीच चर्चा होणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशन यानंच कंगनाच्या विरोधात ही एफआयआर दाखल केली होती. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
7/7
2013 ते 2014 या दरम्यानच्या काळात कंगनानं त्याला 100 हून अधिक ई-मेल केल्याचा आरोप त्यानं यात केला होता. हृतिक आणि कंगनानं काही चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. ‘क्रिश ३’ या चित्रपटादरम्यान त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. पण, रोशन कुटुंबाकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)