राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
2/8
लाखों भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून कोकणातील प्रसिद्ध अशा मसुरे गावातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.
3/8
आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही.
4/8
मंदीराकडे जाणारे सर्व मार्ग पोलीस प्रशासाकडून सील केले आहेत.
5/8
दरवर्षी ही यात्रा तीन दिवस भरते. मात्र यावर्षी कोरोनामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला आहे.
6/8
मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
7/8
मंदिराच्या गाभाऱ्या बाहेरील परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
8/8
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रशासनाने आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा साध्या पध्दतीने साजरी करावी असे आदेश मंदिर प्रशासनाला दिले आहेत.