एक्स्प्लोर
Shravan 2024 Bhimashankar : आज पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर फुललं; भरपावसात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा फोटो
shravan 2024: यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे. या वेळी श्रावणाचा पहिला सोमवार 5 ऑगस्ट रोजी आला आहे. यानिमित्त भाविकांनी श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली.
Shravan 2024 Bhimashankar blossomed on first Shravani somvar
1/16

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार व्रतलैकल्यांचा असून हा सर्वात महत्वाचा मानला जातो. आज पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यातील श्री क्षेत्र भिमाशंकरला देखील पहाटेची महाआरती करण्यात आली.
2/16

यावेळी मुख्य शिवलिंगाला भस्म चोळण्यात आला.
3/16

बेल-भंडारा वाहून शिवलिंगाची पूजा करण्यात आली.
4/16

पहाटेच्या सुमारास भीमाशंकर मंदिरातील पूजाऱ्यांनी महादेवाच्या पिंडीची विधीवत पूजा पार पाडली.
5/16

शिवपिंड फुलांच्या आरासांनी सुंदर अशी सजवण्यात आली.
6/16

यानंतर पुण्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे पहाटेची आरती पार पडली.
7/16

दुग्धाभिषेक, डमरु आणि शंखनाद केल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.
8/16

श्रावण महिना शिवशंकराच्या पूजेसाठी समर्पित असतो. यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली. तब्बल 71 वर्षांनी हा योग आला असल्याने या महिन्याचं महत्त्व विशेष आहे.
9/16

श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली.
10/16

सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं भिमाशंकर देवस्थान,बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील सहाव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
11/16

हिरव्यागर वातावरणात,पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात न्याहाळुन गेला आहे.
12/16

याच वातावरणात भाविकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासून लागल्या आहेत. भर पावसात रेनकोट घालून भाविक पहाटेपासून दर्शनरांगेत उभे आहेत.
13/16

पहाटेपासून शिस्तबद्ध पद्धतीत दर्शन सुरु आहे.
14/16

सर्व जाती धर्माच्या सीमा पार करत देशभरातील भाविक भिमाशंकरला दाखल झाले आहेत.
15/16

हर हर महादेव ,ॐ नम: शिवाय असा गजर करत श्रावण महिन्याचा आज शुभारंभ झाला आहे.
16/16

भीमाशंकर मध्येही सध्या हाच उत्साह पाहायला मिळत आहे.
Published at : 05 Aug 2024 09:01 AM (IST)
आणखी पाहा























