एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : गणेश पूजन कधी करावं? जाणून घ्या अचूक मुहूर्त
Ganesh Chaturthi 2024 : सगळीकडे गणेशोत्यवाची धामधूम पाहायला मिळतेय. त्यानुसार उद्या म्हणजेच 07 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
Ganesh Chaturthi 2024
1/8

गणरायाची स्थापना करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गणेश पूजनाचा मुहूर्त नेमका कोणता याबद्दल अनेकांच्या मनात द्विधा मनस्थिती असते.
2/8

दा.कृ.सोमण, ज्येष्ठ पंचांगकर्ते सांगतात, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांपासून ते दुपारी 01.50 पर्यंत मध्यान्ह काल आहे. या वेळेत गणेश पूजन करावं. पण सर्वांना हे शक्य होईल असं नाही
3/8

प्रात:काळ पासून म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजेच दुपारी 01 वाजून 50 मिनिटांपर्यंत गणेश पूजन करावं.
4/8

अगदी कोकणी माणसापासून ते मुंबईकरांपर्यंत प्रत्येकालाच सध्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. गल्लोगल्ली ढोल-ताशा पथकांची तयारी, आगमन सोहळे, मंडप सजावटी पाहून मनातील आतुरता आणखी वाढत जाते.
5/8

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर्व प्रथम सकाळी लवकर उठणं, अंघोळ करणं, देव्हारा स्वच्छ करुन बाप्पाची पूजा करणं.
6/8

दररोज सकाळ-संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करुन बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेने त्याचा निरोप घ्यावा आणि मूर्तीचं विसर्जन करावं.
7/8

गणेशोत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्याने बाप्पा मनुष्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतो सुख-समृद्धीसोबतच बाप्पा भक्तांना संपत्तीचा आशीर्वाद देतात. .
8/8

श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
Published at : 06 Sep 2024 03:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
























