एक्स्प्लोर
Chandra Grahan 2024 : चंद्रग्रहण 4 राशींसाठी ठरणार लकी; 18 सप्टेंबरपासून जगणार राजासारखं जीवन, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Chandra Grahan 2024 : चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला आहे. वर्षातील हे दुसरं चंद्रग्रहण काही राशींसाठी भाग्याचं ठरणार आहे, त्यांचे येणारे दिवस ऐशोआरामात व्यतीत होतील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Chandra Grahan 2024 Lucky Zodiacs
1/10

भारतीय वेळेनुसार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 06:11 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. हे चंद्रग्रहण सकाळी 10:17 वाजता संपेल. हा चंद्रग्रहणाचा काळ काही राशींसाठी सुखाचा ठरू शकतो.
2/10

चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे तुम्ही सुखात जगाल. या काळात तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल, तुम्ही ऐषोआरामाचं जीवन जगाल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
3/10

वृभष रास (Taurus) : या काळात वृभष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात.
4/10

तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ ठरेल. शेअर मार्केट आणि सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल. आरोग्यही चांगलं राहील, पण आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या.
5/10

मिथुन रास (Gemini) : मिथुन राशीच्या दहाव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे, यामुळे या काळात तुमची संपत्ती वाढेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यात तुम्हाला अफाट यश मिळेल.
6/10

जे तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत आहेत, ते आता तुमच्या मार्गातला अडथळा बनणार नाही. या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता, पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता.
7/10

वृश्चिक रास (Scorpio) : वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे यानंतरच्या काळात तुम्ही परदेशात जाण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने चांगले दिवस सुरू होतील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
8/10

येत्या काळात ऐशोआरामात तुमचं आयुष्य व्यतीत होईल. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच लक्ष्मी देवीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील.
9/10

धनु रास (Sagittarius) : चंद्रग्रहणाचा धनु राशीवर देखील चांगला परिणाम होणार आहे. या काळात मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामं सोपी होतील, तसेच पूर्णही होतील.
10/10

तुमच्या भावा-बहिणींबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील. ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून थांबलेलात, तुमचं ते काम लवकरच पूर्ण होताना दिसेल.
Published at : 15 Sep 2024 11:17 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
आशिया कप 2022
बॉलीवूड



















