एक्स्प्लोर
Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 'या' राशीत होणार! गंभीर परिणाम भोगावे लागणार? ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...
Chandra Grahan 2023 : 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीत होईल. या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

Chandra grahan 2023 in india marathi news
1/9

ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होत आहे. हे ग्रहण पहाटे 01:05 ते पहाटे 02:24 पर्यंत राहील. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे.
2/9

हे चंद्रग्रहण भारतातही पाहता येणार आहे. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे.
3/9

चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे, ती पाहण्यासाठी कोणत्याही विशेष संरक्षणाची आवश्यकता नाही. कोणत्याही मदतीशिवाय ते उघड्या डोळ्यांनी देखील पाहिले जाऊ शकते.
4/9

धार्मिक दृष्टीकोनातून चंद्रग्रहण अशुभ मानले जाते, त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. या काळात, वेगाने जाणारा चंद्र केतूच्या अशुभ प्रभावाने त्रस्त होतो.
5/9

28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुरू होणारे चंद्रग्रहण मेष राशीत होईल. या राशीत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना ग्रहणाचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.
6/9

ज्योतिषशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष राशीच्या लोकांच्या जीवनशैलीवर पडेल. कुंडलीत चंद्राच्या कमजोर स्थितीमुळे तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
7/9

image 7
8/9

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या पडणाऱ्या सावलीमुळे मेष राशीच्या लोकांना काही शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. चंद्राचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी या राशीच्या लोकांनी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 27 Oct 2023 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
