एक्स्प्लोर
Budh Gochar 2025 : निर्जला एकादशीला होणार बुधाचं संक्रमण; 'या' 4 राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार, आरोग्यही राहील ठणठणीत
Budh Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. यंदा निर्जला एकादशीच्या दिवशी बुध ग्रह संक्रमण करतायत. या संक्रमणामुळे धन वृद्धीचा शुभ योग जुळून येणार आहे.
Budh Gochar 2025
1/9

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. यंदा निर्जला एकादशीच्या दिवशी बुध ग्रह संक्रमण करतायत. या संक्रमणामुळे धन वृद्धीचा शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळेल.
2/9

यंदा निर्जला एकादशीला काही राशींचं भाग्य उजळू शकतं. कारण ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग निर्माण झाला आहे.
3/9

ज्योतिष शास्त्रात भद्र राजयोगाला धनसंपत्ती आणि वैभवाचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे या ग्रहाला विशेष महत्त्व आहे.
4/9

6 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी बुध ग्रह स्वराशी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. बुध ग्रह करिअर, वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो.
5/9

सिंह राशीच्या लोकांसाठी निर्जला एकादशी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. व्यवसायाचा विस्तार वाढेल.
6/9

मेष राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, वाढत्या धनसंपत्तीमुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
7/9

कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग फार लाभदायी ठरेल. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तुमच्या पदोन्नतीत वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
8/9

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार भाग्याचं ठरणार आहे. या काळात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल. पैशांची भरभराट होईल. तसेच, प्रमोशन देखील मिळेल.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Jun 2025 11:47 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























