एक्स्प्लोर
Bada Mangal 2024 : आज सर्वात शेवटचा 'मोठा मंगळ'! हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टींचं करा दान, वर्षभर राहील बजरंगाची कृपा
Bada Mangal 2024 : आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी देशभरातून भक्त आजच्या दिवशी हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात.
Bada Mangal 2024
1/10

आज ज्येष्ठ महिन्यातील सर्वात शेवटचा मोठा मंगळ आहे. या दिवशी भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच, आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी देशभरातून भक्त हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात.
2/10

तसेच, आजच्या दिवशी लाल आणि भगव्या रंगांच्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही गरजूंना लाल वस्त्र दान करू शकता. यामुळे तुम्हाला बजरंगबलीचा आशीर्वाद मिळेल.
3/10

असं म्हणतात की, यामुळे तुमच्या जीवनात राहिलेल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तसेच, रखडलेली कामेही पूर्ण होतील.
4/10

मोठा मंगळच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू सर्वसामान्यांना वाटा. तसेच, गरजूंना दान करा.
5/10

असं म्हणतात की, याच्या प्रभावाने व्यक्ती करिअरमध्ये चांगली उंची गाठू शकतो.
6/10

तसेच, आजच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मंगळाची स्थिती मजबूत होते.
7/10

बडा मंगळच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोकांच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो.
8/10

आजच्या दिवशी जर तुम्ही तूप दान केले तर व्यक्तीला सुख प्राप्त होते. दाम्पत्त्यांची अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.
9/10

आजच्या दिवशीचा शुभ मुहूर्त 8.53 पासून ते दुपारी 2.07 वाजेपर्यंत असणार आहे.
10/10

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 18 Jun 2024 12:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















