एक्स्प्लोर
Photo : मिरचीच्या कीड व्यवस्थापनासाठी युवा शेतकऱ्यानं शोधली भन्नाट आयडिया
ब्लॅक थ्रीप या किडीवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने प्रभावी उपाय शोधून काढला आहे. राजुरा तालुक्यातील पंचाळा इथं राहणाऱ्या सतीश गिरसावळे (Satish Girsawle) असं तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
Chandrapur News
1/10

मिरचीच्या कीड व्यवस्थापनासाठी युवा शेतकऱ्यानं भन्नाट आयडिया शोधली आहे. राजुरा तालुक्यातील पंचाळा इथं राहणाऱ्या सतीश गिरसावळे (Satish Girsawle) या तरुण शेतकऱ्याने आपल्या निरीक्षणातून या किडींचा नायनाट करण्यासाठी एक यंत्र तयार केलं आहे. त्यानं सौरऊर्जेवर चालणारं यंत्र तयार केलं आहे.
2/10

मिरचीवरील कीड व्यवस्थापनासाठी अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पंचाळा इथं राहणाऱ्या सतीश गिरसावळे (Satish Girsawle) या तरुण शेतकऱ्याने हे यंत्र तयार केलं आहे.
3/10

ब्लॅक थ्रीप किडीमुळं महाराष्ट्रासह तेलंगणातील मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यासोबतच राजूरा तालुक्यातील मिरची पिकाचे देखील मोठं नुकसान झालं. यावर उपाय म्हणून युवा शेतकऱ्यानं निळा प्रकाश सापळा तयार केला.
4/10

ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो आणि साठलेल्या पाण्यात पडतो. त्यामुळं ब्लॅक थ्रीपचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करता येत असल्याची माहिती शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली.
5/10

निळा प्रकाश सापळा तयार केला केल्यानं शेतकरी मोठा औषधांवरचा खर्च वाचू शकतो.
6/10

कोणत्याच रासायनिक आणि सेंद्रिय उपायांना दाद न देणाऱ्या या किडीवर निळा प्रकाश सापळा प्रभावी उपाय आहे.
7/10

इंडोनेशियावरुन आलेल्या ब्लॅक थ्रीप किडीमुळं (Black thrips) मिरची पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान होतं. पण निळा प्रकाश सापळा बसवल्यानं मिरचीच्या पिकाचे संरक्षण करता येते.
8/10

ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून यावरती काही ट्रायल केल्या. यावरती निळा प्रकाश सापळा तयार केल्याची माहिती शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली.
9/10

निळा प्रकाश सापळा हा घरी असलेल्या वस्तुपासून तयार करता येतो. एका तेलाच्या पिपांमध्ये प्रकाश सापळा बनवला आहे. यामध्ये आपोआप लाईट चालू आणि बंद करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
10/10

सौरऊर्जेवर चालणारे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अल्प किंमतीत मोठे वरदान ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आणि तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात सध्या मिरची पिकातील फुल किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ही आयडिया हिट ठरली आहे.
Published at : 11 Nov 2022 07:50 AM (IST)
आणखी पाहा























