एक्स्प्लोर
PHOTO : लाल चिखल...कवडीमोल दरामुळे टोमॅटो तोडणी बंद केल्याने शेतशिवार लालेलाल
लातूरमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झालेली आहे. मात्र, भाव घसरल्याने कवडीमोल उत्पन्न हाती येत आहे. परिणाम शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे.

Latur Tomato Rate Drops
1/9

लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गाव टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी जास्तीत जास्त भाजीपाल्याकडे वळलेला आहे.
2/9

टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन वडवळ शिवारात होत असल्यामुळे बाहेरील व्यापारी थेट बांधावर येऊन टोमॅटोची खरेदी करतात. म्हणून शेतकऱ्यांना टोमॅटोचा अधिक फायदा होतो.
3/9

यंदाही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झालेली आहे. मात्र, भाव घसरल्याने कवडीमोल उत्पन्न हाती येत आहे.
4/9

परिणाम शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतशिवार टोमॅटोमुळे लालेलाल झाल्याचे दिसत आहे.
5/9

वडवळसह परिसरातील ब्रह्मवाडी, शिवापूर तांडा, शंकरनगर तांडा, खुर्दळी, मोहनाळ, कडमुळी, घरणी, घारोळा, दापक्याळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून टोमॅटोची लागवड केली आहे.
6/9

लाखो रुपयांचे कीटकनाशक आणून टोमॅटोवर रोगराई होऊ नये म्हणून काळजी घेऊन फवारणी करण्यात आली.
7/9

एवढा खर्चा करुनही सध्या टोमॅटो कवडीमोल किंमतीने जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो तोडणे बंद केले आहे.
8/9

एकीकडे मजुरांची मजुरी वाढली असून शेतकऱ्याला मजुरी देऊनही टोमॅटो विक्रीतून शिल्लक काही राहत नाही.
9/9

त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटोचे मोठ-मोठे फड तसेच सोडून दिल्याने पूर्ण शेतशिवार लालेलाल होऊन टोमॅटो जाग्यावर गळत आहेत.
Published at : 03 Jan 2023 01:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
