एक्स्प्लोर
कापूस आयात केल्यानं दर पडले, अनिल देशमुखांची सरकारवर टीका
केंद्र सरकारनं कापसावरील 11 टक्के आयातशुल्क माफ करुन 16 लाख कापूस गाठी आयात केल्या आहेत. कापूस आयात केल्यामुळं देशात कापसाचे भाव पडले आहेत.

cotton
1/9

केंद्र सरकारनं कापसावरील 11 टक्के आयातशुल्क माफ करुन 16 लाख कापूस गाठी आयात केल्या आहेत.
2/9

कापूस आयात केल्यामुळं देशात कापसाचे भाव पडले आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलं.
3/9

कॅाटन असोशीयशन ॲाफ इॅडियाच्या दबावामुळे केंद्र सरकारने कापसावलील 11 टक्के आयात शुल्क रद्द केल्याचे देशमुख म्हणाले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे देशमुख म्हणाले.
4/9

आज कापूस आणि सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघत नाही. राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. 1 हजार 71 कोटीच्या मदतीची घोषणा केली आहे.
5/9

शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदतीचे पैसे जमा केले नसल्याचे देशमुख म्हणाले. कापूस, सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही तर यंदा शेतकरी आत्महत्या वाढणार असल्याचे देशमुख म्हणाले.
6/9

मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाणार आहे. सरकार फोडाफोडीचं राजकारण करत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे देशमुख म्हणाले.
7/9

महाविकास आघाडी सरकारच्या असताना कापसाची आयात केली नाही. उलट निर्यात केली. त्यामुळं कापसाला 11 हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता.
8/9

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं कापसाच्या दरात घसरण होत असल्याचे देशमुख म्हणाले.
9/9

सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण कापसाला कमी दर मिळत आहे.
Published at : 23 Oct 2023 05:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion