एक्स्प्लोर
PHOTO : या वर्षीच्या खरीप पिकांच्या किमान हमी भावात घसघशीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय
Kharip Crop MSP: केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान हमीभाव किंमत जाहीर केली असून त्यामध्ये तुरीच्या किमतीत 400 रुपयांची तर सोयाबीनच्या किमतीत 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Kharip Crop MSP
1/9

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये 143 रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये 210 रुपायंची वाढ करण्यात आली आहे.
2/9

भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती 2183 रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता 235 वर पोहोचला आहे.
3/9

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली.
4/9

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
5/9

केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे.
6/9

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे.
7/9

भात - 2183 रुपये - 143 रुपयांची वाढ ज्वारी - 3180 रुपये - 143 रुपयांची वाढ ज्वारी मालदांडी - 3225 रुपये - 235 रुपयांची वाढ
8/9

रागी - 3846 - 268 रुपयांची वाढ तूर - 7000 रुपये - 400 रुपयांची वाढ सोयाबीन - 4600 रुपये - 300 रुपयांची वाढ
9/9

मूग - 8558 रुपये - 803 रुपयांची वाढ तिळ - 8635 रुपये - 805 रुपयांची वाढ
Published at : 07 Jun 2023 07:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion