एक्स्प्लोर

Ahmednagar News: शेतकऱ्याच्या पाठीवरचं ओझं कमी करणारा शोध; युवकाने बनवला पोर्टेबल स्प्रे पंप

Ahmednagar News:  पाठीवरच्या पंपाने शेतकऱ्यांना पाठ दुखीचा तर त्रास होतोच सोबतच फवारणी पंपातील औषध हे पाठीवर सांडल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. आता यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Ahmednagar News:  शेतकऱ्यांना पाठीच्या फवारणी पंपामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील सीतपुर येथील युवक मयूर गाढवे याने एक इकोफ्रेंडली फवारणी पंप बनवला आहे. विशेष म्हणजे हा फवारणी पंप पाठीवर घेऊन चालण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दिलासा असणार आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सीतपूर येथील मयूर गाढवे याने पोर्टेबल स्प्रे पंप तयार केला आहे. वडील आणि आजोबा शेतकरी असल्याने शेतात पाठीवरील फवारणी पंपाने फवारणी करताना त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याला पोर्टेबल स्प्रे पंप बनविण्याची कल्पना सुचली. मयुरने पाठीवर न घेता फवारणी पंप चार रबरी चाकांवर कसा बसवता येईल यासाठी एक बेस तयार केला त्यासाठी लागणारे लोखंड हे त्याने भंगारच्या दुकानातून आणले. त्याचा दोन बाय चार फुटाचा बेस तयार करून घेतला. त्यानंतर त्याला चार रबरी चाके बसवले. त्यावर सुरुवातीला लोखंडी टाकी बसवली मात्र त्याचे वजन जास्त होत असल्याने 100 लीटर क्षमतेची प्लास्टिकची टाकी त्यावर बसवली. या पंपांसाठी 12 हॉल्टची मोटार बसवली विशेष म्हणजे ही मोटार सौरऊर्जावर चार्जिंग केली जाते. एक व्यक्ती सहज ओढू शकेल आणि आणि कोणत्याही प्रकारच्या फळबागांमध्ये चालवता येईल अशा पद्धतीचा पंप त्याने बनवला त्यासाठी त्याच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले.

मयूरचे वडील हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना शेती व्यवसाय स्वीकारावा लागला. मयूर पोर्टेबल स्प्रे पंपची कल्पना आपल्या वडिलांसमोर मांडली. त्याने मांडलेल्या कल्पनेला त्याच्या वडीलांनी आणि आजोबांनी देखील साथ दिली. विशेष म्हणजे "आविष्कार" या महाविद्यालयातील स्पर्धेत त्याच हे संशोधन राज्यस्तरापर्यंत पोहचलं आहे.  सध्या जरी हा पंप ओढण्याचे श्रम शेतकऱ्यांना पडत असले तरी भविष्यात याच पंपांत बदल करून हा पंप रिमोटवर कसा चालेल यासाठी मयूर प्रयत्न करणार आहे. या पंपाला केवळ पाच हजार रुपये खर्च आला असल्याने इतरही शेतकऱ्यांना हा पंप परवडण्यासारखा असल्याचे मयूरचे वडील सुधाकर गाढवे सांगतात.

शेतकऱ्यांना दिलासा 

पाठीवरच्या पंपाने शेतकऱ्यांना पाठ दुखीचा तर त्रास होतोच सोबतच फवारणी पंपातील औषध हे पाठीवर सांडल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यातच पाठीवरील पंपची क्षमता 16 लिटर एवढीच असल्याने शेतकऱ्यांना एक स्प्रे घेण्यासाठी शेतात अधिक फेऱ्या माराव्या लागतात. त्यात श्रम अधिक लागतात आणि वेळही जातो. त्यामुळे हा फवारणी पंप शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर आहे असं गावातील शेतकरी सांगतात.

मयूरने बनविलेल्या फवारणी पंपाचे पेटंट आपल्या नावावर केले आहे. त्यामुळे वडील आणि आजोबांचे श्रम कमी करण्याच्या उद्देशाने बनविलेल्या पंपांची जर बाजारात मागणी झाली, तर त्यापासून तो नवीन स्टार्टअप देखील सुरू करू शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
Sunil Kedar : 30 सप्टेंबरची मुदत संपली, सुनील केदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार? कारण समोर
नागपूरमधील काँग्रेस नेते सुनील केदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर? कारण समोर
Embed widget