Yavatmal: यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर लादले मातृत्व; दवाखान्यात गेल्याने फुटले बिंग, मुलीच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal: यवतमाळमध्ये खेळण्याबागडण्याच्या कोवळ्या वयातच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. यात पीडित बालिका ही चार महिन्याची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यवतमाळ: यवतमाळमध्ये (Yavatmal News) 12 वर्षांच्या मुलीवर मातृत्व लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीतेचा पती आणि आईविरोधात गुन्हा (FIR Registered Against Mother) दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याने दवाखान्यात उपचारासाठी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे.
यवतमाळमध्ये खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयातच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह (Child Marriage) लावून दिला. यात पीडित बालिका ही चार महिन्याची गरोदर राहिली. परंतु दवाखान्यात उपचारासाठी गेल्याने सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणात पतीसह पीडितेच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मारेगाव तालुक्यातील एका गावामध्ये आज उघडकीस आली.
मारेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येथिल एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह (Child Marriage) पाच महिन्यापूर्वी म्हणजेच 18 जुलै 2022 ला नागपूर जिल्ह्यातील (Nagpur) एका मुलासोबत लावून दिला. त्यावेळेस मुलीचे वय अवघे 12 वर्षाचे होते. लग्नानंतर पीडित बालिका ही चार महिन्याची गरोदर झाली. मुलीची तब्येत बिघडल्याने आईने चार महिन्याच्या आपल्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेले, यावेळी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत याविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात (Maregav Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी पिडीतचे आई व नागपूर जिल्हातील पतीविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, बलात्कार आदी कलमाअन्वये गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
आजही राज्यात दरवर्षी हजारो बालविवाह (Child Marriage) होतात. बालविवाहाचे खासकरून मुलींच्या जीवनावर घातक परिणाम होतो. बालविवाहामुळे मुलींच्या अंगभूत कौशल्यांवर, ज्ञानावर, सामाजिक सामर्थ्यावर, गतिशीलतेवर आणि एकंदरीत स्वायत्ततेवरही मर्यादा येते. त्या कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचाराला बळी पडतात. बालवधूंना आरोग्य, शिक्षण आणि इतर मुलभूत हक्कांपासूनही वंचित ठेवले जात. त्यांना शाळेत जाण्यापासून रोखलं जात. त्याचा परिणाम त्यांना आजीवन भोगावा लागतो. बालवधूंना कमी वयातील गर्भधारणा(Pregnant) आणि बाळंतपणांमुळे धोकादायक संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे या मुलींना वैद्यकीय त्रासालाही सामोर जावं लागतं ज्यातनं शारीरिक समस्या निर्माण होतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Bhandara Crime : अल्पवयीन विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती, पतीसह माहेर आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल