एक्स्प्लोर

यवतमाळमधील शेतकऱ्याने फणस शेतीतून साधलीय आर्थिक उन्नती, 30 झाडांमधून दरवर्षी सव्वा लाखाचं उत्पन्न

बंडू जाधव यांची 15 एकर शेती असून 12 गुंठ्यांत पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी आंध्र प्रदेशातील फणस रोपांची लागवड केली. लागवडीनंतर पाच वर्षांनी त्याला फळे येऊ लागली.

यवतमाळ:  फणस (Jackfruit) म्हटले की डोळ्यासमोर येते कोकणातील फणसशेती. पारंपरिक पिकासोबतच वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण यवतमाळच्या पुसद तालुक्यातील चिलवाडी शिवारात येथे पहावयास मिळते.  बंडू जाधव या शेतकऱ्याने फणस शेती केली आणि बारा गुंठ्यातून भरघोस उत्पन्नही घेत आहे. जाधव यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या 30 झाडांमधून ते दरवर्षी सव्वा ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवतात. 

बंडू जाधव यांची 15 एकर शेती असून 12 गुंठ्यांत पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी आंध्र प्रदेशातील फणस रोपांची लागवड केली. लागवडीनंतर पाच वर्षांनी त्याला फळे येऊ लागली. दरम्यान आंतरपीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न देखील घेतले तर आता झाडे मोठे झाल्यानंतर त्यात गुरांसाठी वैरण घेतली जाते. या फणस झाडांना बुरशीनाशक फवारणी शिवाय कुठलाही खर्च नाही. केवळ झाडांची फांदी छाटणी ते करतात. सद्यस्थितीत खोडांपासून फणसांची ही झाड फळांनी लगडली आहेत.

फणस हे कोरडवाहू फळझाड असून फणसाची झाडाला कुठलेही रासायनिक खते व कीटकनाशके न फवारणी करता वाढलेली दिसतात. फणसाचे पीक उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणारे आहे. जाधव यांनी  भौगोलिक स्थिती आणि पोषक वातावरणाचा अभ्यास करुन ही झाडे 15 वर्षांपूर्वी लावली मागील दहा वर्षापाऊसून उत्त्पन्न येण्यास सुरुवात झाली. 

 शेतकरी खरिपात सोयाबीन, कापूस, तूर तर रब्बी हंगामात गहू, हरबरा हे पिके घेतात. मात्र शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात यासाठी त्यांना पुसद महागाव आर्मी यवतमाळ नांदेड येथील व्यापारी स्वतःच शेतामध्ये येऊन फणस खरेदी करतात त्यामुळे त्यांना मार्केट  शोधण्याची कुठेच आवश्यकता नाही.

पारंपारिक शेतीला जोडधंदा

पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अनेक शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घेत आहे. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देत कृषीविषयक विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होतात. पारंपारिक शेतीला जोडधंदा व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कृषी उत्पन्नात वाढ करावी. मागील अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग आणि भाजीपाला शेती यातून नफा मिळवून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब कराताना दिसत आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget